ग्रामपंचायत राडेवाडी
गावाचा इतिहास आणि सण.
राडेवाडी हे गाव वारकरी संप्रदायाचे असून गावातील प्रत्येक घरात एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी आहेत.
गावामध्ये दररोज सायंकाळी ठीक ७ ते ९ या वेळेत वारकरी संप्रदायिक भजन केले जाते. तसेच वारकऱ्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला नियमित कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
गावामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज, संत एकनाथ षष्ठी, श्री रामनवमी उत्सव, श्री हनुमान जयंती, श्रीकृष्ण जन्माष्टमी इत्यादी उत्सव ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
गावातील सर्व वारकरी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या फडाचे अनुयायी आहेत. त्यामुळे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर, श्री गुरु दादासाहेब आजरेकर, श्री गुरु भाऊसाहेब आजरेकर व श्री गुरु नानासाहेब आजरेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
दरवर्षी वैशाख कृष्ण अष्टमी ते वैशाख कृष्ण अमावस्या या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला जातो. तसेच मार्गशीर्ष शुद्ध १ ते ८ या कालावधीत संत तुकाराम महाराज गाथा पारायण आयोजित केले जाते. याशिवाय गोकुळ अष्टमी निमित्त श्रावण कृष्ण १ ते ८ या कालावधीत आणखी एक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला जातो. अशा प्रकारे वर्षातून एकूण तीन ज्ञानेश्वरी पारायण सोहळे संपन्न होतात.
गावातील अनेक वारकरी दर महिन्याला पंढरपूरची वारी करतात. तसेच चैत्र, आषाढ, कार्तिक आणि माघ या चारही वार्यांमध्ये आपल्या सोयीप्रमाणे पंढरपूरला जातात.
याशिवाय संत तुकाराम महाराज बीज उत्सवासाठी श्री क्षेत्र देहू येथे तसेच संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आळंदी येथेही मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित राहतात.
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सर्व सोयींनी युक्त श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी निवास बांधलेला आहे.
स्थानिक मंदिरे, वारसा स्थळे.

लोककला, संगीत आणि परंपरा.

गौरवशाली व्यक्ती (स्वातंत्र्यसैनिक, कलाकार, शिक्षक इ.).

कृषीभुषण पुरस्कार प्राप्त - श्री. प्रशांत भानुदास पाटील.
१. महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे कडून वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त सन २०११
२. महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे कडून वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सन २०२०
३. DSR इंदोर मध्यप्रदेश यांचेकडून गुणवत्ता पूर्ण व शात्रशुद्ध सोयाबीन उत्पादक पुरस्कार प्राप्त
FPO गटांची माहिती आणि त्यांचे कार्य.
"गावचा आवाज" ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव व ज्ञान शेअर करणारे व्हिडिओ.










